।। पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया||         ||कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ।।         ।। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ।।        ।। संतांचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणें पंथे ।।        ।। वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।        ।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥

आमच्या वेब साईटवर तुमचे स्वागत आहे

जीवन व्यवहारात संघर्ष, विक्षेप अटळ आहे. शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही, मात्र विक्षेपात जो शांत राहतो त्याची शांती कायम राहते, म्हणून भगवंतानी वनातील विद्या रणामध्ये आणली अर्थात अर्जुनाचे निमित्त करून जगाला गीता युद्धासारख्या विक्षेप स्थितीमध्ये (worst condition) सांगून व्यवहार कालीन समाधी (शांतता ) शिकवीली. परिपूर्ण जीवनाकरिता युद्ध ज्ञान, शुद्ध भावना(भक्ती ) , शुद्ध क्रिया आवश्यक आहेत. कारण जसे ज्ञान असेल त्याप्रमाणे भावना व तश्याच क्रिया घडतात. म्हणून वेद शास्त्र, पुराणे, व संत, शुद्ध ज्ञान सर्व खल्विद ब्रम्ह, विश्व हे परमात्म स्वरूप आहे, म्हणून सर्वांवर परमात्मा समजून प्रेम करणे हि शुद्ध भक्ती व सर्वांची परमात्मा समजून प्राप्त कर्म हिच सेवा याची शिकवण देतात याच वेदानुमोदित संत मार्गाला अनुसरून आजच्या आधुनिक दैनंदिन जीवनात व्यवहार्य भाषेतून तीच ज्ञानगंगा / ज्ञानदीप सर्वांपर्यंत पोहचवण्याकरिता हा अल्पसा प्रयत्न आहे.


।। श्री संतांचिये माथा चरणावरी ।।

 • आमचे साहित्य

  “ ।। भागवतामृत ।। ”

  आनंदी जीवनाकरिता विनामुल्य ऑडिओ, व्हिडीओ डाउनलोड आणि ग्रंथ ऑर्डर करा

  पुढे वाचा... »

 • डाउनलोड

 • पुढील कार्यक्रम

  पंढरपुर वारी
  २९ जून ते १९ जुलै २०१६

  पंढरपुर वारी, आळंदी ते पंढरपुर

  भागवत कथा कारंजगाव येथे, निफाड, जि. नाशिक २० जुलै ते २६ जुलै २०१६

  रामकथा २७ जुलै ते २ ऑगस्ट नानगाव येथे दौंड.

  प्रवचन आळंदी येथे २७ ऑगस्ट पासुन

आमचे साहित्य

 • भागवत कथा

  सर्वांना दैनंदिन जीवनात सर्व परिस्थितीत विज्ञाननिष्ठ सुलभ भाषेत मार्गदर्शन व श्रवनााद्वारे ज्ञान, क्रीया व प्रेम प्राप्तीपुर्वक दोष, दु:ख निवृत्त करून परमानंद देणारे रोचक संगीतमय भागवत कथा विवरण
  (भक्त व भगवान कृष्ण चरित्र)

  पुढे वाचा... »

 • रामायण कथा

  सर्वांना दैनंदिन जीवनात सर्व परिस्थितीत विज्ञाननिष्ठ सुलभ भाषेत मार्गदर्शन व श्रवनााद्वारे ज्ञान, क्रीया व प्रेम प्राप्तीपुर्वक दोष, दु:ख निवृत्त करून परमानंद देणारे रोचक संगीतमय रामकथा विवरण
  (भक्त व भगवान राम चरित्र)

  पुढे वाचा... »

  WEBSITE VIEWS :    good hits